मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. याची तयारी प्रशासन मागील अनेक दिवसापासून करत होते. यावेळी या कार्यक्रमाला हजारो महिला पुरुष संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून येणार असल्याने त्याच्या साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नागरिकांना देण्यात आलेले जेवण हे अतिशय निष्कृत दर्जाचे होते. या जेवनाचा वास येत होता. त्यामुळे अनेक नागरिकांनी जेवण तर घेतले पण जेवण खराब असल्यामुळे ते फेकून दिले. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात नागरिकाच्या जीवाशी खेळणारे जेवण दिल्याने प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नगर परिषद उपमुख्य अधिकारी अभिजित मोटघरे यांनी या खराब जेवणा बाबत आक्षेप घेतला आहे. नागरिकांना खराब दर्जाचे जेवण पुरवून नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो महिलांनी यावेळी प्रशासन आणि नेत्यावर संताप व्यक्त केला. व्यवस्था करता येत नसेल तर आम्हाला कशाला येते बोलवण्यात आले अशा प्रकारे आपला रोष व्यक्त केला.