राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- बदलापूर येथील एक मोठी बातमी समोर येत आहे. संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरवणाऱ्या बदलापूर येथील मधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला आज नवे वळण आले आहे. 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या गेल्याची बातमीने खळबळ माजली आहे. समोर आली आहे. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलीस जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला, यात नराधम अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे वर गोळीबारात तो जखमी झाला होता, पण रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर या गोळीबारात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना मुंब्रा बायपास जवळून जात असताना, आरोपी अक्षय शिंदे याने एपिआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्व्हर खेचली यावेळी आरोपीने निलेश मोरे यांच्यावर केल्या 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरच्या पायाला लागली तर 2 गोळ्यांचा फायर चुकला. त्यानंतर जखमी निलेश मोरे यांनी त्याही परिस्थितीत अक्षय शिंदेवर हल्ला केला. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी, स्वरांक्षणासाठी गोळीबार केला. स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरिरावर लागली. यावेळी पोलिसांनी दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं असता अक्षय शिंदे याला डॉक्टरानी तपासणी करून मृत घोषित केल. आणि जखमी पोलिसावर उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, बदलापूर शाळेतली दोन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. अक्षयला ट्रान्झिट रिमांडमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. जीपमधून नेत असताना अचानक अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. यावेळी त्याने पोलिसांवरच 3 राऊंड फायर केले होते. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. अक्षयला एक गोळी लागली आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गोळीबार एक पोलीस अधिकारीही जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.