मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.22:- पंचायत समिती हिंगणघाटच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते संपन्न झाला. पंचायत समितीची बांधकामासाठी 14 कोटी 99 लक्ष रुपये शासनाने मंजूर केले असून या इमारतीचे भव्य दिव्य बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. आज भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी श्री. रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, सुरेश वाघमारे माजी खासदार, गंगाधर कोल्हे माजी सभापती पंचायत समिती हिंगणघाट, शारदा आंबटकर माजी सभापती पंचायत समिती हिंगणघाट, प्रफुल्ल बाडे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट, आकाश पोहाणे, डॉ. पर्बत, श्री. अंजने गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, श्री. खैरे उपविभागीय अभियंता लघू पाटबंधारे विभाग, घनश्याम येरलेकर, ज्योत्स्ना सरोदे माजी जिल्हा परिषद सदस्य, वैशाली पुरके, वंदना मडावी, लता घवघवे, इंदिरा उरकुडकर, सुनंदा सांयकर, श्री बेहेकर सहाय्यक गटविकास अधिकारी हिंगणघाट, श्री.गुडंतवार कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग वर्धा, अमोल चिरुटकर, सचिन सावरकर, नितीन सुकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार समीर कुणावर यांनी सांगितले की, पंचायत समिती हिंगणघाटच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन हा ऐतिहासिक दिवस माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. १४ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर होऊन या इमारतीचे बांधकाम सुरू होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्राम विकास मंत्री यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प शक्य झाला. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.