अनिल अडकिने, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- आदर्श हायस्कूल पाटनसावंगी मध्ये झालेल्या तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा मधे डॉ. हरिभाऊ आदमने कनिष्ठ महविद्यालय ने अंतिम सामन्यात सारस्वत कनिष्ठ विद्यालय सावनेरचा १३ – २३ या फरकाने ने एकतर्फे पराभव करीत आदमने महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. या सामन्यात सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वीरेंद्र जुमडे व अधीक्षक चंद्रकांत वानखेडे यांनी महाविद्यालयाचे नाव उचवल्याबद्दल सर्व खेळाडू चे अभिनंदन केले.तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांनी सुधा खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजयी खेळाडूंचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सुनील केदार, शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ.दिनेश कीमटा, के.डी.पवार शारीरिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील व प्रा.कपिल खुबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.

