पोषण माह निमित्त राबविला जातोय उपक्रम, चाळीस प्रकारचे विविध पोषक आहार तयार करुन पालक मातेला सांगितले पोषण आहाराचे महत्व.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: तालुक्यातील रीमडोह येथील अंगणवाडीत पोषण अभियानाचे आयोजन करण्यात आले. पोषण माह निमित्त हा उपक्रम राबविला जात आहे. चाळीस प्रकारचे विविध पोषक आहार तयार करुन पालक, मातेला पोषण आहाराचे महत्व यावेळी समजाऊन सांगण्यात आले. कुठल्या दिवशी कुठल्या वेळी कुठल्या प्रकारचा आहार किती प्रमाणात द्यायचा व त्याचं महत्त्व हे मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी हा आहार किती महत्त्वाचा याबाबत देखील सखोल मार्गदर्शन करण्यात आलं.
हिंगणघाट येथील ICDS प्रकल्प अधिकारी अमोल चिरुटकर यांच्या संकल्पनेतून व पर्यवेक्षक ऋषाली कोपरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अल्पना उईके (अंगणवाडी सेविका) यांनी स्वतः पकवान बनविले. यावेळी पोषण माह चे आयोजन करून ICDS सिंबोल तयार करुन पोषण पाककृतीने सजवीण्यात आले होते. या पोषण माह कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रितम कुमरे ग्राम पंचायत सदस्य आजंती, निता भोमले, माया शंभरकर, सविता शंभरकर, काजल दांरुडे, तारा भोमले, ज्योती भिरंगे या सर्व अंगणवाडी सेविकान सह अर्चना मेश्राम (आशा वर्कर रिमडोह) देवतळे मॅडम (रिमडोह शिक्षीका) सहारे मॅडम (रिमडोह शिक्षीका) व रिमडोह गावातील माता भगिनी मंडळी यांनी पोषण माह कार्यक्रमात सहभाग नोंदविला.