*स्वातंत्र्यापासून आजही विकासापासून कोसो दूर, नामदार, डॉ, धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो.नं. 9420751809.
————————-
अहेरी तालूक्यातील चिरेपल्ली,कोत्तागूडम, पत्तीगाव ,मरनेली या गावात अजून पर्यंत पक्के रस्ते पोहचलेले नाही.याबाबत शासनास वेळोवेळी निवेदने करून मागणी करण्यात आले,परंतू आम्हाच्या हाती फक्त निराशा आली रस्ता अभावी या भागातील लोकांचा तालूक्याशी संपर्क तूटतो तसेच या क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक,शैक्षणिक ,समाजिक अडचणी ला सामना करावा लागतो .या सर्व अडचणी लक्षात घेऊन गावातील नागरिकांना मा. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन संगितले आहे की सध्या तातपूरती रस्ता दूरूस्ती करून ध्यावी व निवडणूकीनंतर डांबरीकरण करून देण्यात यावी. अन्याथ होणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असे निवेदनातून सागण्यात आले,आहे.निवेदन देताना भगवान मडावी, सतिश,मडावी,रविंद्र सोयाम, मनोज पेंदाम,तूकाराम आलाम, संजू तलांडी,गोपी पेंदाम,मल्लेश सोयाम.आदी गावातील नागरिक उपस्थित होते.

