उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- आज घर अंगण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शोभा राजपूत यांचा जंगी सत्कार सोहळा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला संस्थेच्या अध्यक्षा आशाताई भोईर व सचिव नलिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
घर अंगण संस्थेच्या स्वतंत्र सैनिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणारी रणरागिनी शोभा राजपूत यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा नोकरीचा प्रश्न येरेनिवर आला होता दिनांक२८ ऑगस्टच्या जीआर मध्ये त्यांना नोकरीवरून कमी केले होते तो २८ऑगस्ट २०२४ चा जीआर रद्द करण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते ज्या स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी बलिदान केले. लढा दिला झेल भोगले त्या स्वतंत्र सैनिकांच्या पाल्यांना नोकरीच नाही म्हणून शोभा राजपूत ह्या लेकरांची माय बनून त्यांच्या पाठीशी उभी राहिली जीवाची परी काष्टा करत ती शेवटी संभाजीनगर या ठिकाणी आमरण उपोषणास बसली शोभा राजपूत यांचे वडील गोवा मुक्त भूमी संग्राम लढ्यात सामील झाले होते त्यांची कन्या उपोषणास बसल्या नंतर चार दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाल्याचा विचार करून स्वतः उपस्थित राहून चौथ्या दिवशी उपोषण सोडविले लिंबू सरबत देऊन शोभा राजपूत यांचे उपोषण स्थगित केले. नोकरा देण्याचा आश्वासन दिले तो जीआर पण मंजूर केला.
त्यांच्या या निर्णयाने पाच हजार लोकांची प्रश्न सुटला एकनाथ शिंदे आश्वासन दिले यांची कामगिरी ह्या लढ्यात त्यांच्या बरोबर नांदेडहून अनेक ८० ते ९० वयोगटाचे वय वृद्ध सामील झाले होते. भाऊसाहेब साळुंखे, आप्पासाहेब शिंदे, संजय जाधव, चोंदे साहेब, खांदवे दादा अंकित असे अनेक लोकेश सामील झाले होते ह्या लोकांच्या सहकार्याने हा लढा पार पडला घर अंगण संस्थेचे पदाधिकारी यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे आभार मानले व शोभा राजपूत यांचं अभिनंदन व गुण गौरव केला. घर अंगन खजिनदार पूनम भोईर, व्यवस्थापिका उषा सूर्यवंशी, शोभा मोरे कार्यवाहक, ॲड. श्रीकांत मोरे पाटील, शहर अध्यक्षा अरुणा सोनवणे तसेच सदस्य सगुणा लहामटे, अर्चना जोशी, संग्राम सर व दिगंबर जाधव यांनी पाठिंबा दिला.