प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील शास्त्री वार्ड येथील अविनाश नवरखेडे याला काल दि.२७ रोजी पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करीत त्याचे ताब्यातील टाटा पंच कार तसेच देशी दारूच्या दोन हजार शिश्या असा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसानं कडून प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी क्र.एम एच ३२ ए एस ९९८५ या वाहनाने शास्त्री वार्ड हिंगणघाट परिसरात देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना काल शुक्रवारी मिळाली होती. सदर माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पोलीसांनी कार थांबवून कारची पाहणी केली. यावेळी कार मध्ये २० खर्ड्याचे खोक्यात ९० एम एलच्या देशी दारूने भरलेल्या २ हजार देशी दारूच्या शिश्या आढळल्या. उपरोक्त दारूसाठा आरोपी अविनाश मनोहर नवरखेडे रा.शास्त्री वार्ड यांचे ताब्यातून पोलीसांनी एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक सतीश जायभाये, पो.हवा. यशवंत गोल्हर, ना.पो.का विकास अवचट, राकेश आष्टणकर, नरेंद्र आरेकर पो.का संतोष लोहाटे यांनी केली यांनी केली.