मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.३० सप्टेंबर:- गिमाटेक्स वणी युनिट येथिल दिवंगत कमलाकर ठाकरे हे कामगार रिंगफेम विभागात कार्यरत होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे माहे जुलै-२०२४ मध्ये आकस्मिक निधन झाले. त्या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार समिर कुणावार तसेच संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांच्या निर्देशानुसार गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर शाकीर पठाण यांचेकडे पाठपुरावा करून मृत कामगाराच्या परीवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.
यावेळी गिमाटेक्स वणी युनिटच्या व्यवस्थापन व संघटना यांच्यातील कराराप्रमाणे प्रती कामगार १०० रुपये वेतनातून कपात करून एकुण रूपये १ लाख ४२ हजार ३०० रक्कमेचा धनादेश दिवंगत कामगाराच्या परीवाराला आर्थिक मदत म्हणून देण्यात आला.
सदर कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला संघटनेचे जनरल सेक्रेटरी सर्वश्री पांडुरंग बालपांडे, दिवाकर बरबटकर, दामोदर देशमुख, जिवन भानसे, प्रशात शेळके, राकेश तराळे, जयंत बावणे, हेमंत भगत, श्रावण थुटे, विनोद कावळे, मनोज जुमडे, विजय थुल, विनोद कोल्हे, लक्ष्मण जयपुरकर, राहुल देशमुख, भाजपा हिंगणघाट ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद विटाळे, भाजपा सक्रिय कार्यकर्ता चंदूभाऊ मावळे, सरपंच नितीन वाघ, राकेश शर्मा इत्यादी मान्यवर सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.