प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिगणघाट दि. १ ऑक्टोबर:- कामगार नेते डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक याच्या नेतृत्वात अंपग बांधवाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आणि उपविभागीय अधिकारी याच्या आश्वासना नंतर अंपग बांधवाचे आंदोलन मागे घेण्यात आले.
हिंगणघाट येथे बांधण्यात आलेल्या माडाचे क्वाटर अंपग बांधवाना देण्यात यावे. अंपग बांधवाना 10 हजार रूपये दरमाह देण्यात यावे. शासकीय नोकर भरतीत 5% कोटा असून त्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी उपोषन सुरू करण्यात आले होते. त्या आंदोलनाला 6 दिवस पूर्ण झाले असून आज दिनांक 1 आक्टोबरला शासना तर्फ आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी यांनी मागण्या मान्य करत पुढील आदेश वरिष्ठ अधिकारी करतील असे आश्वासन देऊन उपोषन मागे घ्यावे अशी विनती केली. त्यांच्या विनतीला मान देत यावेळी डॉ उमेश वावरे यांनी उपोषन मागे घेतले.
प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न झालास परत एकदा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यानंतर त्याची सर्वच जबाबदारी प्रशासनाची असेल अशा इशारा यावेळी दिव्यांग बांधवासह डॉ. उमेश वावरे यांनी दिला. यावेळी उपस्थित मनिष कांबळे, चारू आटे, प्रविण कावळे, अमरसिंह गगनवार, आकाश बोकरे प्रफुल्ल ऊके, मनोज बोटकवार, प्रफुल शेंन्डे, हसन अली, नदिम पठान, मनर्कना थुल, सूनदा जामूनकर, मिनाबाई धनरे, गणेश मगरूड, बालू लाल लोंखडे, कलावती सहारे, बरकत अन्सारी, देवीदास लोहकरे,तारकेश रामटेके, सुरेश भरणे राजू खानकूरे सह शेकडो कार्यकर्ता उपस्थिति होते.