मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809
*दिनांक 1 आक्टोंबर 2024* *चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा येथील रहिवाशी सर्व परिचित साहित्यिक नाटककार पुंडलिक भांडेकर यांचे दोन मुले आहेत यापैकी वेदांत पुंडलिक भांडेकर वय 15 वर्ष शिक्षण इयता 10 वी वर्ग या मुलास जन्मापासून मानसिक अशक्तपणाचा आजार आहे याकरिता कुनघाडा येथील पुंडलिक भाऊ भांडेकर यांनी आपल्या आयुष्यातील कमावलेला खूप मोठा आर्थिक खर्च आपला मुलगा वेदांत याच्या पुढील उपचारासाठी खर्च केले आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक दवाखान्यात वेदांतचा उपचार झाला परंतु त्याच्या तब्येतीत एवढी काही सुधारणा झाली नाही व आजही वेदांत मानसिक अशक्तपणाचा रुग्ण असल्याने आपल्या घरी नेहमी खाटेवरच राहावे लागते व दैनंदिन जीवन क्रिया खाटेवरच करावी लागते व त्याची प्रत्येक सुश्रुषा वेदांतची आई करीत असते व गेल्या दहा वर्षापासून सदर सुश्रुषा या भांडेकर कुटुंबाकडून अविरत सुरू आहे परंतु भांडेकर कुटुंबीयाने कधीच हार मानले नाही*
*व त्याचे उपचार करीता लागणारे दैनंदिन औषध गोळ्या आर्थिक परिस्थिती सुदृढ नसताना सुद्धा सुरू ठेवले आहेत व आर्थिक अडचणीमुळे पुंडलिक भांडेकर यांना अनेक समस्या निर्माण होत आहे ही माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांना मिळाली व त्यांनी या कुटुंबास सदिच्छा भेट देण्याची इच्छा व्यक्त केली व या कुटुंबीयास स्वतः भेट देऊन वेदांत चे वडील पुंडलिक भांडेकर यांना पुढील उपचारा करिता स्वतःकडून आर्थिक मदत केली व यावेळी बोलताना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी सांगितले गडचिरोली जिल्ह्यातील अशा मानसिक अशक्तपणा ग्रस्त रुग्णांना केंद्र व राज्य सरकारने यांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने केले यावेळी आमचे मार्गदर्शक राजेश भाऊ झोडे,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेन्द्र विश्वास विदर्भ अध्यक्ष जावेद अली विदर्भ सचिव अनिल गुरणुले, देवानंद पाटील खुणे ,गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे ,भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ समरित, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ गजपुरे गडचिरोली जिल्ह्य अध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष ,लोकेश भाऊ डोंगरवार, मुन्ना भाऊ दहाडे ,कृष्णा भाऊ वाघाडे पुरुषोत्तम गोबाडे ,महिला आघाडी अध्यक्ष मनिषा ताई मडावी , जिल्हा संघटन सचिव स्वप्निल मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर मुलचेरा तालुका अध्यक्ष सचिन विश्वास, व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*