आमदार समीर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. ०२ ऑक्टोंबर:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात युवा मोर्चा व भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज ०२ ऑक्टोंबर २०२४ हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष विवेक मडावी यांचे सह असंख्य युवकांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ०२ ऑक्टोंबर २०२४ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने वृषभ बाळबुधे, आशुतोष उरकुडकर, गणेश सोनवणे, साहिल तिमांडे, ईश्वर कळसकर, ओम शास्त्रकार, भूषण डडमलवार, साहिल मेश्राम, संकेत पिसे, आदित्य कळसकर, स्वप्निल बाळबुद्धे, आदेश कुमरे, अनिकेत उरकुडकर, वेदांत चनखोरे, विवेक मडावी, दुर्वेश मासुरकर, स्वप्निल कुरेवार, रुद्रेश्वर बैलखोडे, अक्षय सालेकर, किसन मासुरकर, सुदेश मेश्राम, निखिल चव्हाण ईत्यादीसह अनेक युवा पुरुष कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार यांचे सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, शहराध्यक्ष भूषण पिसे, जितू शर्मा, अनुकूल कोचर, रोशन डागा, चंदूभाऊ मावळे, इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित होते.