अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक भारत विद्यालय हिंगणघाट येथे महात्मा गांधी व लालबहादूर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर, उप मुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, ज्येष्ठ शिक्षक धनंजय सरोदे व मार्गदर्शक शिक्षक गजानन सयाम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व उपस्थित मान्यवर यांनी महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले. यावेळी वर्ग ०५ ते ०९ च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर गीत सादर करून सुंदर भाषणे दिली.
याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक डॉ. गजानन सयाम यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले. तसेंच भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे लाल बहादूर शास्त्री यांचेही योगदान फार मोठे होते. लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत डॉ. गजानन सयाम यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजु कारवटकर म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे. या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून राजू कारवटकर यांनी विचार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पायल खेडकर हिने मानले.

