प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.01 ऑक्टोंबर:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेत्वृत्वात परिवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. परिवर्तन जनसंवाद यात्रेचा आजचा दिवस चौथा असून हिंगणघाट शहरातील अनेक स्थिकानी भेटी देऊन त्यांचा समस्या जाणून घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन जनसंवाद यात्रा आज सायंकाळी नन्नाशाह वॉर्ड, डांगरी वॉर्ड, हनुमान वॉर्ड, खंडोबा वॉर्ड, भिमनगर वॉर्ड येथे परिवर्तन जनसंवाद यात्रा पार पडली. यावेळी प्रभागातील महिला, तरुण वर्ग जागोजागी औक्षवंत करून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे स्वागत करीत होते. अतुल वांदिले यांनी प्रभागातील प्रत्येक घरोघरी जात बेरोजगार युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या घरापर्यंत येऊन आपल्या समस्या जाणून घेत आहे यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते.
आज परिवर्तन जनसंवाद यात्रेची सभा लोटन चौक येथे पार पडली. या सभेला प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.