अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३ ऑक्टोंबर:- आज पासून सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या नवरात्रीच्या पावन पर्वावर प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक सावनेर तर्फे आज शहरात माँ वैष्णोदेवी व महाराष्ट्राची कुलदेवता मा तुळजाभवानी येथून आलेल्या ज्योतीचे स्वागत भव्य मिरवणुकीने करण्यात आले. सोबतच मा दुर्गा च्या प्रतिमेचे शहरात स्वागत करण्यात आले.
नवरात्र महोत्सव निमित्त श्रीमद देवी भागवत महापुरानाला सुरुवात झाली. ह.भ.प. संजीवनी कृष्णा शिंदे रा. मनमाड यांचे सुद्धा भव्य मिरवणुकी द्वारे स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक कापूस जिनिंग बसस्टँड, बाजार चौक ते होळी चौक प्रगती दुर्गा उत्सव मंडळा पर्यंत ज्योत आणण्यात आली. यावेळी शहरातील अनेक भजन मंडळी, लेझीम पथक, महिला मंडळ, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
मिरवणुकीमध्ये मंडळाचे अध्यक्ष अशोक उमाटे, महादेव घुमडे, राजू भुजाडे, तुषार उमाटे, तुळशीराम बनकर, प्रवीण करोले, हिमांशू चाफेकर, तेजराम बोरेकर, रिंकेश उमाटे, सुनील पिसे, राजूभाऊ घटे, नर्सिंग खांडे, रवींद्र देशमुख, प्रवीण रासेकर, भूषण कांबळी, अरुण नारेकर, रामदास वाडबुदे, सुनील घोलसे, प्रशांत घोळसे, संजय जवाहर, धनराज शास्त्री, सचिन व्यवहारे, मोनीश बागडे, अमन करोले, विलास उमाटे, बाल्या वानखडे, कृष्णा गावंडे, कपिल बोबडे, मदन शेंबेकर, शेखर वाट, दिनेश कडू, पद्माकर कामोने, मनीष चित्तेवाण, सुनील वाढबुदे, पुरुषोत्तम ढवंगाळे, राजूभाऊ शर्मा, ज्ञानेश्वर निंबाळकर, भोजराज घटे, वीरेंद्र देशमुख, सुधाकर धाडोळे, विकी उमाटे, यश उमाटे, तिलकराज बोरेकर, वैभव देशमुख, जगदीश सातपुते, पियुष बनकर, आदित्य लोही व परिसरातील समस्त महिला व पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीत अनेक लोकांकडून चहा, फळ, केळी, पाणी वाटप तसेच फुलांचा वर्षाव सुद्धा करण्यात आला.