वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण करणारी घटना समोर आली आहे. येते कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर 3 नराधमाने शस्त्राच्या धाकावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.
तीन नराधम आरोपीनी या तरुणीला कोयता, लाकडी बांबू आणि धारदार चाकूचा धाक दाखवत तिचा मित्राला जीवाने ठार मारण्याची धमकी देत या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या मित्रांना सांगितलं. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे प्राथमिक उपचार घेऊन मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचे रेखाचित्र जारी केले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाल्यानंतर तरुणीने स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. पोलिसांची 14 पेक्षा जास्त पथके आरोपींच्या मागावर आहेत.
बोपदेव घाटात घडली घटना:
अजूनही आरोपींचा ठावठिकाणा नाही: दरम्यान, तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडून अनेक तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पुणे पोलिसांची जवळपास 14 पथके वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा याच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्ब्ल 10 किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत.