रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- आज सकाळच्या सुमारास महाराष्ट्रात तीन जागी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यात समावेश असल्याचा संशय घेत महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएस ने संयुक्तपणे कारवाई करून जालन्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जालना जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
यात अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात पकडण्यात आलेला संशयित तरुण चामड्याचा व्यापारी असून पहाटे चार वाजल्यापासून या तरुणाची एनआयए कडून चौकशी करण्यात येत आहे.
जालना शहरातील रामनगर परिसरातून एका चामड्याच्या व्यापाऱ्यालाही एनआयए कडून ताब्यात घेण्यात आले आहे. सकाळी चार वाजल्यापासून सुरु चौकशी जालना जिल्ह्यातील रामनगर चमडा परिसरात एका संशयितांची एनआयए कडून चौकशी करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत असून चौकशी सुरु असलेला तरुण चमड्याचा व्यापारी असल्याचं समोर येतंय. आज पहाटे 4.00 वाजता या तरुणाचा दरवाजा एनआयए आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दार ठोठावले आणि चामड्याचा हा व्यापारी दहशदवादी कृत्यात सामील असल्याच्या संशयातून एनआयए च्या तावडीत सापडला आहे. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई सुरु असून या तपासात नक्की काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काय कारणास्तव होतेय चौकशी देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून महाराष्ट्रात एनआयए आणि एटीएस ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजी नगर जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून देश विघातक कृत्यांमध्ये या तरुणांचा संबंध असल्याचा संशय आहे.

