राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- ११ वा आणि १२ वा दीक्षांत समारंभ आणि गोंडवाना विद्यापीठ वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती कुलगुरू डॉ.प्रशांत बोखारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉ. सुधीर मुनगंटीवार, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते यांच्या उपस्थितीत आचार्य पदवीधारकांना पदवी बहाल करण्यात आली व पदवी-पदवीव्युत्तर पदवी मध्ये गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी जिवती तालुक्यातील नारपठार या छोट्याश्या गावातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे युवा कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. प्रा.डॉ.पांडुरंग माधव सावंत यांना राज्यशास्त्र विषयात आचार्य पदवी बहाल करण्यात आली. अत्यंत बिकट परिस्थिती मधे संशोधन करून पीएचडी सारखी उच्च पदवी प्राप्त करणे ही अत्यंत प्रशंसनीय बाब असल्याचे बोलले जात आहे.
या पदवीचे श्रेय डॉ.पांडुरंग सावंत यांनी आचार्य पदवी चे मार्गदर्शक डॉ.राजेंद्र मुद्दमवार, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, आदर्श शिक्षणं प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, गोंडवाना शिक्षणं संस्थेचे अध्यक्ष गजानन जुमनाके, मोठे बंधू विठ्ठल सावंत, निर्मलाबाई सावंत, पत्नी राधिका पांडुरंग सावंत, भाऊजी वामन जाधव, कौशल्याबाई जाधव, सहकार्य करणारे मार्गदर्शक व सर्व मित्रमंडळी यांना दिलेले आहे.