वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- महिलांवर अत्याचार वाढू लागले आहेत. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळकरी मुलींवर वाढलेल्या अत्याचाराच्या प्रकारामुळे पालकांची चिंता वाढली आहे. त्यात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे शिक्षक शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. येते एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने क्रिकेट खेळाडू विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेच्या क्रीडा शिक्षकाने एका क्रिकेट खेळाडू विद्यार्थिनीचा विनंयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेळाडू मुलीला क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी कर्णधार पद देण्याचं आमिष दाखवत जवळीक साधून शिक्षक राजेंद्र यांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीने शिक्षकाचा त्रास सहन न झाल्याने क्रीडा शिक्षकाने तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहे.