A1 डान्स स्टुडिओ यांच्या सहयोगाने गरबा रात्री चे उत्सवात आयोजन करण्यात आले.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नवरात्र म्हटलं की सर्वांचा उत्साह पाहायला मिळतो तो गरबा नाईट मध्ये. अनेक वर्षापासून इनरव्हील क्लब आणि रोटारेक्ट क्लब, हिंगणघाट गरबा नाईटचे आयोजन हिंगणघाट वासीयां करिता करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गरबा नाईट चे आयोजन मोहता भवन येथे दिनांक 29 सितंबर रोजी करण्यात आले. अतिशय उत्साहामध्ये हिंगणघाट वासीयांनी गरबा करण्याकरिता तसेच गरबा बघण्याकरिता आपला सहभाग नोंदवून यावर्षीच्या नवरात्री सुरू होण्यापूर्वीच्या गरबा नाईट या कार्यक्रमास खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन इनरव्हील क्लब आणि रोटरेक्ट क्लबचा उत्साह वाढविला.
यावेळी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट डॉ. रुपल कोठारी, सेक्रेटरी सारिका डोंगरे आणि रोटरेक्ट क्लबचे प्रेसिडेंट निकुंज मूंधड़ा, सेक्रेटरी रिचा पालीवाल तसेच इनरव्हील क्लबच्या गरबा प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष डालिया, संगीता राका, शोभा बोथरा, मोनाली मॅडमवार आणि रोटरेक्ट क्लबचे प्रोजेक्ट डायरेक्टर मयूर कटारिया, अर्पिता मोहता, प्रणीत भेंडे यांच्या परिश्रमाने व दोन्ही क्लबचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी गरबा रात्री मध्ये बेस्ट कॉस्ट्यूम, बेस्ट डान्सर विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी क्लबने सर्व सहकाऱ्यांचे तसेच सर्व मेंबर्स चे व एवन डान्स स्टुडिओच्या शिखा मुखी यांचे आभार मानले.