गुरुदेव सेवा मंडळाच्या पवित्र कार्याचा प्रचार प्रसार करा: मोहनदास मेश्राम
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 6:- एकता भजन मंडळ, चंद्रपूर येथील महिलांची भजनाद्वारे विविध विषयांवर जनजागृती सुरू असून गेल्या 15 वर्षांपासून त्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रवास करून स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरण, बालविवाह, हुंडाबंदी, शिक्षणाचे महत्त्व आदी विषयांवर भजनाद्वारे जनजागृती करतात.
चंद्रपूर येथील एकता भजन मंडळाच्या महिला छबू वसंत रागीट, कुसुम मधुकर रागीट, कल्पना बंडू रागीट, शिल्पा अनिल रागीट, ज्योती प्रमोद मदीनवार, लता मनोहर रागीट, सारिका मनोज खणके, सविता राजू दर्वे, अल्का दत्तराज खनके, मिना शामसुंदर सुपारे, मंगला सुधाकर बानकर यांनी नुकतेच राजुरा येथे जवाहर नगर मध्ये नीलकंठ जैराम बेले यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका प्रमुख मोहनदास मेश्राम यांनी गुरुदेव सेवा मंडळ व त्यांचे कार्य कसे चालते याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी शिला बेले, बादल बेले, सुवर्णा बेले, विकास बेले, रुपाली बेले, रवींद्र शेंडे, नवनाथ वैरागडे आदींची उपस्थिती होती.