अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंदी माता परिवार, भारत अंतरराष्ट्रीय विश्व ज्योति संस्था ट्रस्टच्या वतीने जीबीएमएम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संस्थापक डॉ. परमानंद शुक्ला आणि क्षेत्रीय संयोजक अधिवक्ता अब्दुल अमानी कुरैशी यांनी सर्व हिंदी सेवकांचा सन्मान केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता इब्राहीम बख्श आजाद यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात कार्यक्रमाचे आयोजक अधिवक्ता अब्दुल अमानी कुरैशी यांनी हिंदीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की हिंदीला प्रतिष्ठा देण्यासाठी आणि तिची प्रत्येक विषयात अभिव्यक्त होण्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. आता सरकारने हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता द्यायला हवी. मात्र, राजकीय फसवणूक आणि मतांच्या खेळामुळे हिंदीला मागे ढकलण्यात आले आहे.
कुरैशी पुढे बोलताना म्हणाले की, हिंदीच्या प्रचार आणि प्रसारात कार्यरत संस्थांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. आपल्या प्रशासकीय यंत्रणे कडे हिंदी शब्दावली असली तरी तिचा वापर होत नाही. परदेशी भाषेचा (इंग्रजी) वापर करून आपले शान वाढले असे समजल्या जाते. कायदा, न्यायालये आणि प्रशासन या सर्व क्षेत्रांत हिंदीची स्थिती दुर्बल आहे.
अध्यक्षीय भाषणात शांतिलाल कोचर गोल्डी यांनी हिंदीची महत्ता अधोरेखित केली. ते म्हणाले, “जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती हिंदीत संवाद साधतो, त्यामुळे हिंदी निर्विवादपणे भारताची राष्ट्रभाषा आहे.” त्यांनी असेही नमूद केले की हिंदी ही भारतीय संस्कृतीची वाहक आहे आणि ती देशाच्या प्रत्येक भागातील लोकांना एकत्र आणते.
या कार्यक्रमाच्या शेवटी हिंदी सेवक आणि कवींचा सत्कार करण्यात आला. त्यात एस.आर. फुटाणे, एम.एस. कुरैशी, एस. तराळे, डॉ. अनीस बेग, शगुफ्ता नियाजी, शमीम जकरीया, विजया अनिल कडू आणि इतरांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या शेवटी कवी संमेलन आयोजित करण्यात आले, जिथे विविध कवींनी हिंदीवरील आपल्या रचना सादर केल्या.