संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दि. 05 ऑक्टोंबर:- रोजी राजुरा येथे शौर्य, धैर्य, राजकीय निर्णय, राष्ट्रप्रेमी गौंड राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राजुरा येथील आदिवासी समाज व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या देशातील स्री राज्यकर्त्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या असल्या तरी त्यांचे शौर्य, धैर्य, राजकीय निर्णय, राष्ट्रप्रेम खूप गौरवपूर्ण आणि अभिमानास्पद होते. यामध्ये गौंडची राणी दुर्गावतीचे शौर्य, धाडस, निर्भयता, अस्मिता तेजस्वी सूर्यासारखी होती. पतीच्या मृत्यूनंतर गौंड राज्यावर तिने 15 वर्षे राज्य केले. आपल्या राज्याच्या रक्षणासाठी तिने तीनवेळा बलाढ्य मुघलांना पराभूत केले. शेवटच्या युद्धात मात्र मुघलांपुढे नतमस्तक होण्याऐवजी जखमी झाल्यावर स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून देशासाठी बलिदान दिले. अशा रणरागिणी राणी दुर्गावती यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा चंद्रपूर आदिवासी समाजाचे पदाधिकारी तसेच विदर्भ महासचिव नितीन सिडम, जिल्हा उपाध्यक्ष शुभम आत्रम, विदर्भ प्रसिध्दी प्रमुख आदिवासी सामाजिक महिला पुरुष बाल गोपाल तसेच राणी दुर्गावति समितीचे पदाधिकारी अरुण कुमरे तसेच सर्व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होऊन जयंती साजरी करण्यात आली.