युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- येथिल संत सावता मंदिर सभागृहात दिनांक 1 आक्टोंबर 2024 मंगळवार ला कळमेश्वर जेष्ठ नागरिक संघटनेची आमसभा संपन्न झाली. यात सर्वानुमते नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
आमसभेचे अध्यक्ष डॉ. कृष्णाजी बगडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुधीर भगत अध्यक्ष फेस्काम नागपूर विभाग हे होते. या वेळी काशिनाथ चिमूरकर, मनोहर राऊत, मेघराज नवले, मुकिंदा राऊत, ताज महंमद शेख, दयाराम धनगरे, अरुण धोटे, हरिभाऊ शेंडे, ज्ञानेश्वर गूळांदे, उमादेवी गौतम, वरिष्ठ पत्रकार युवराज मेश्राम प्रधान संपादक महाराष्ट्र संदेश न्यूज तथा शितल नंदनवार न्यूज इंडिया चैनल 2/4 च्या संपादिका तथा पत्रकार चांदणी पाठक संपादिका हमारी चौपाल नागपूर हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरिभाऊ शेंडे यांनी केले तर वार्षिक अहवाल सचिव मेघराज नवले यांनी सादर केला. यावेळी दहावी व बारावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तथा 75 वर्षावरील 21 ज्येष्ठ नागरिकांचा शाल शिल्ड व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बारावी व दहावीच्या प्राविण्य विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार तसेच यावेळी पत्रकार युवराज मेश्राम, शितल नंदनवार व चांदनी पाठक यांचाही यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षपदावरून कृष्णाजी बगडे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी शासनाने विविध उपक्रम आणलेले आहेत, त्याचा फायदा सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्गरम्य सहली आरोग्य विषयक शिबिरे, योगा क्रीडा इत्यादी विविध उपक्रम जेष्ठ नागरिकांना सहभागी करून साठ वर्षावरील नागरिकांना आपण या संघटनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे असे ते याप्रसंगी म्हणाले.
यावेळी इतनी शक्ती हमे देना दाता सामूहिक गीत झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा वरील प्रबोधन गीत संघटनेचे सदस्य आकाशवाणी व दूरदर्शन कलावंत अरुण सहारे यांनी मंचकावरून सादर करून वाहवा मिळवली. यावेळी संघटनेच्या सदस्या नलिनी देशमुख यांनी पदाधिकारी व सदस्यावर कॉमेडी गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताज महंमद शेख व कृष्णा शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर राऊत मानले. याप्रसंगी या कार्यक्रमाला कळमेश्वर तालुक्यातील बहुसंख्येने जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य गण उपस्थित होते.

