कापेवार-बेलदार समाज भवनाचे थाटात लोकार्पण सोहळा
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- निवडणुका येतात, जातात पण पायाभूत कामे हेच तारत असतात, त्यामुळे मतांचे लालसेपोटी मी इथे आले नसून आणि मत मागणार नसून अस्सल कामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहा असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ, धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. ते रविवार 6ऑक्टोबर रोजी अहेरी लगतच्या गडअहेरी येथे कापेवार समाज भवनच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
अध्यक्ष स्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते किष्टय्या उपलपवार होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी आर.के. पारेल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, सतिश तोटावार, आनंद रालबंडीवार, राजेश्वर रंगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना मंत्री ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, बेलदार -, कापेवार समाज भवनाचे काम पूर्णत्वास आले असून समाज भवनामुळे समाजाचे सर्वांगीण विकास होते, आज पर्यंत आपण वेगवेगळ्या समाजासाठी असंख्य समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून समाज भवन उभारले असून आजचे लोकार्पण सोहळा ऐन निवडणुकीच्या हंगामात असले तरी, निवडणुकीवर डोळा ठेऊन मी मते मुळीच मागणार नाही, पण कामे करणाऱ्यांच्या पाठीशी जनता जनार्धन भक्कम पणे उभे राहते असा मला पूर्ण पणे विश्वास असल्याचे ठाम मत व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
अध्यक्षीय स्थानावरून समाजाचे ज्येष्ठ नेते किष्टय्या fउपलपवार यांनी, आपल्या भागात एक मोठी वास्तू बनली असून याचे संपूर्ण श्रेय राज्याचे मंत्री ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांना जाते त्यामुळे कापेवार -, बेलदार व अन्य तत्सम समाज एकजुटीने मंत्री ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठीशी सोबत राहावे असे आवाहन केले.
याचवेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, प्रशांत नामनवार यांनी भव्य दिव्य समाज भवनाच्या बांधकामाविषयी आणि समाजसुधारक मा.सा. कन्नमवार यांच्या कार्याचा उहापोह करून राज्याचे मंत्री ना.डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळे प्रशस्त व भव्यदिव्य समाज भवनाचे काम शक्य झाल्याचे ठणकावून सांगून समाज एकजुटीने धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठीशी भक्कमणे सोबत राहणार असल्याचे ग्वाही दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका गडपल्लीवार यांनी तर सूत्रसंचालन प्राजक्ता पेदापल्लीवार यांनी केले.उपस्थितांचे आभार शालिनी मुक्कावार यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.