*भामरागड तालुक्यातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांनी केले आहे*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम,हलगेकर यांच्या नेतृत्वात 8. ऑक्टॉबर ला सकाळी ठीक 11 वाजता मोर्चा तहसील कार्यालय भामरागड येथे हजारोच्या संखेत आदिवासी बांधव व महिला उपस्थित राहावे अशे आवाहन माजी जी. पं. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी केले आहे.
भामरागड हा अतिमागास व आदिवासी तालुका असून कोणतेही विकास कामे अदयाप झालेले नाही व धनगर समाज हा आदिवासी समाजात सामील करू नये.पेसा कायद्या अंतर्गत नोकर भरती करण्यात यावे. अश्या अनेक विविध मागणी घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर या भामरागड येथे भव्य मोर्चा काढणार असल्याचे पत्रकाराणा माहिती देण्यात आले .असून भामरागड लाहेरी. कुवाकोडी. बिनागुनंडा. फोडेवाडा व भामरागड तालुक्यातील आदिवासी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.