उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- आनंददायी शिक्षण उपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संतोष कदम यांच्या सहकार्याने शनिवार व रविवार दि. 5 ऑक्टोंबर ते 6 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद शाळा नं.1 इनामधामणी येथे ग्रामपंचायत सदस्य अपर्णा कोळी वंचित बहुजन आघाडी इनाम धामणी, जमणे तनिष्क आय केअर & श्रवणयंत्र सेंटर सांगली व शाळेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी याचा लाभ शाळेतील सर्व विद्यार्थ्यी, गरजू पालकांनी तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी घेतला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अपर्णा कोळी यांनी शिबिराचे उद्घघाटन केले. तसेच शिबिरा करिता डाॅ.मनीषा जमणे, तनिष्क जमणे, मानतेश कांबळे, प्रा. नौबत कोलप यांचे सहकार्य मिळाले. तसेच कसबेडिग्रज केंद्राचे केंद्रप्रमुख शोभा लोंढे यांनी शिबिराला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी एसएमसी चे अध्यक्ष शितल पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिपाली हेरले यांनी विद्यार्थी, पालक व एसएमसी सदस्य यांचे नेत्र तपासणी केल्यामुळे समाधान व्यक्त केले. यावेळी शिबिराचे आयोजन करणाऱ्या मान्यवरांना शाळेच्या वतीने धन्यवाद देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संतोष कदम, सहकारी शिक्षक श्रीधर सूर्यवंशी, मुकुंद कापसे, वर्षा पाटील, पालक निर्मला कोळी,निलम कोळी,अक्षता शेटे यांनी या शिबिराचे संयोजन केले. यावेळी यलो सिटी आंत्रपिनोरशीप फोरमच्या वतीने अभिजित रांजणे व योगेश कांबळे यांनी सर्व शिबीरार्थींना चहाची सोय केली होती.