राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे सर्वच राजकीय पक्षात उमेदवारांची रिघ उभी होताना दिसत आहे, राजूरा विधानसभा क्षेत्राची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी गोंडपिपरी भागातील उमेदवाराला द्यावी याकरिता गोंडपिपरी भागातील सर्वपरिचित युवा नेते अमर बोडलावार यांना भाजपने उमेदवारी द्यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांना शेकडो कार्यकर्त्यांच्या सही ने देण्यात आले.
राजूरा विधानसभा क्षेत्रकारिता आजपर्यंत राजुरावासीय व्यक्तीच या विधानसभेचे आमदार झालेले आहेत. असे असतांना गोंडपिपरी तालुक्याच्या सर्वागीण विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झालेले आहे. अश्यात गोंडपिपरी तालुक्याचा पूर्वानुभव बघितल्या तर यापूर्वी गोंडपिपरी पंचायत समितीवर 6 पैकी 6 पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीचे राहिले तर 3 पैकी 3 जिल्हा परिषद क्षेत्र सुद्धा भाजपाकडे राहिली आहेत.
वर्षभरापूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरीच्या निवडणुकीत तब्बल 35 वर्षानंतर भाजपणे ऐतीहासीक विजय मिळवील काँग्रेसची सत्ता उलथवून लावली. अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. सद्यस्थितीत राजुरा विधानसभेकरिता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी गटतट पडल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे. असे असतांना मात्र राजकारणापलीकडचे संबंध असलेल्या अमर बोडलावारांच्या पाठीशी संपूर्ण गोंडपिपरी तालुका आजही तेवढ्याच ताकतीने उभा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केवळ जातीय राजकारणावर निवडणूक लढण्यापेक्षा लोकाभिमुख, सर्वांना घेऊन चालणारा, विकासाची कास धरणारा, सर्वसमावेशक असा गोंडपिपरी तालुक्यातील यूवा नेतृत्व म्हणून अमरभाऊ बोडलावार यांचीच निवड आमदार पदासाठी योग्य राहील व तेच या क्षेत्रास न्याय देऊ शकतील.
अमर बोडलावरांना राजुरा विधानसभे करिता भाजपाने उमेदवारी दिल्यास याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. गोंडपिपरी तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना भाजपांनी जर त्यांना आशीर्वाद दिला तर यावेळी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून अमर बोडलावार यशस्वी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, आम्ही कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत तेव्हा यंदा उमेदवारीसाठी गोंडपिपरी तालुक्याचा विचार व्हावा अशी मागणी सहीनिशी निवेदनाने माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना गोंडपिपरी भागातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.