युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन रामटेक:- इमारत व बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या किचन किट व पेटीचे वाटप करण्याचा कार्यक्रम येथील बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे रविवारला आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते शेकडो कामगार गरजू महिलांना किचन किट व पेटीचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितले की ही योजना इमारत व बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार मंडळातर्फे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. जसे शैक्षणिक योजना, आरोग्य विषयक योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य योजना, आर्थिक सहाय्य योजना या माध्यमातून सर्व कामगारांना सरकार न्याय देण्याचे काम करत आहे.
यावेळी शेकडो इमारत बांधकाम कामगार बंधू भगिनींना सन्मानाने किटचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी एका रांगेत लागून किट देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील शेकडो लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.