आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागा मार्फत अशोक शिंदे माजी राज्यमंत्री तथा शिवसेना-संपर्क प्रमुख वर्धा जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नाने ४७ लाखाचा निधी विविध विकास कामाकरिता मंजूर झाला. त्यात मंजूर झालेल्या कामाची नावे १) हिंगणघाट प्रभाग क्र. 11 राजमाता मा जिजाऊ चौक निशानपुरा वार्ड मध्ये वॉल कंपाऊंड करणे. २) प्रभाग क्र. ६ मधील सारंग गुडघाने ते कोळसे यांच्या घरापर्यंत साई मंदिर समोरील नालीचे बांधकाम ३) हिंगणघाट प्रभाग क्रमांक पाच ब संत तुकडोजी वॉर्ड प्रा. सुरेशराव वाटकर यांच्या घरा समोरील खुल्या जागेवर वॉल कंपाउंड आणि ग्रीन जिम तयार करणेबाबत ४) हिंगणघाट प्रभाग क्र. २ माता मंदिर वॉर्ड येथील संजय कारेकर ते छोटू वानखेडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड वरचा पूल बांधकाम करणे. क्र. ३ चे काम वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या चारही विकास कामाचे भूमिपूजन अशोक शिंदे माजी राज्यमंत्री व शिवसेना संपर्कप्रमुख वर्धा जिल्हा यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून प्रमुख उपस्थिती मध्ये सुधा शिंदे शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक, रवी धोटे शिवसेना उपजिल्हाप्रमुख, करुणा वाटकर शिवसेना महिला संघटक वर्धा जिल्हा, अमित गावंडे शिवसेना तालुका प्रमुख, महेश मुडे जिल्हाप्रमुख युवा सेना, दादा देशकरी शिवसेना शहर प्रमुख हिंगणघाट, बाळा जामुनकर शिवसेना तालुका प्रमुख समुद्रपुर, चंदू पंडित शिवसेना तालुका प्रमुख हिंगणघाट, प्रशांत लहामगे शिवसेना शहर संघटक, राहुल फुलझले उपशहर प्रमुख, अक्षय निकम शहर प्रमुख युवासेना, प्रमिला हिवंज शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख, उमा पानवटकर शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख, अनिता गौतम शिवसेना महिला आघाडी शहर संघटक तसेच चारही प्रभागातील रहिवाशी व शिवसेना पक्षाचे समस्त शिवसैनिक या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते.

