आ. सुभाष धोटेंच्या वाढदिवसा निमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, राजुरा च्या भव्य पटांगणावर दुपारी ठिक १ वाजता भव्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव माजी खासदार मुकुल वासनिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी संपादक बाळासाहेब कुलकर्णी, सिनेकलावंत अनिरुद्ध वनकर, दिपक काटोले, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विनोद दतात्रय, देवराव भांडेकर, सुभाषसिंग गौर, विनायक बांगडे, नंदू नागरकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा ढोबे, यु. काँ. जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सुनीता लोढिया, संगिता अमृतकर, धनश्याम मुलचंदाणी, सतिश वारजुरकर, प्रवीण पडवेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, दिनेश चोखारे, श्रीधरराव गोडे, विजयराव बावणे, प्रा. दिलीप चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, विकास देवाळकर, महिला अध्यक्षा निर्मला कुडमेथे, आशा खासरे, सोनू दिवसे, नंदा मुसने यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना अ. भा. काँग्रेसचे महासचिव माजी खासदार मुकुल वासनिक म्हणाले की सुभाष धोटे काँग्रेसचे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून जनतेच्या विकासासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस खासदार बाळूभाऊ आणि पून्हा प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्यात, जिल्ह्य़ात काँग्रेसला बळकट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आज देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती नेता कमी अभिनेता अधिक आहे. जी आश्वासने दिली ती एकही पुर्ण केली नाही. आज देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, कामगार, महिला, सर्व समाजातील घटक दुःखी, कष्टी आहे. महिलांवर बलात्कार होत असताना सरकार मुग गिळून गप्प आहेत. आज देशाचे संविधान, लोकशाही, धर्म निरपेक्ष संस्कृती संकटात आहेत. त्यामुळे या संकटांना तोंड देण्यासाठी सुभाष धोटे यांना पून्हा संधी द्या त्यांना पुढे व्यापक भुमिका पार पाडायची आहे. ते या क्षेत्राची दशा आणि दिशा सुव्यवस्थीत करण्यात सक्षम आहेत असे मत व्यक्त केले.
यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, काँग्रेस सर्व धर्म, जाती, समुदायाला सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभेला सुभाष भाऊंनी वडीलाची भुमिका पार पाडली आता मी लेकीची भुमिका पार पाडून भाऊंना निवडून आणण्यासाठी पुर्ण ताकदीने काम करण्याची ग्वाही दिली. तर वाढदिवसाचे अभिष्टचिंतन व सत्काराला उत्तर देताना चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि विचारधारा माझ्या नसानसात भिनला असून मी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून क्षेत्रातील जनतेच्या विकासासाठी आयुष्य खर्ची घालणार आहे असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, NSUI तथा काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन तालुका राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले.