मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
आज दिनांक,१०/१०/२०२४, अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत मेडपल्ली अंतर्गत येणारा *मौजा – तुमिरकसा* गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मासहत या नावाने सातबारा दिल्या जात होता मात्र 2021 पासून शेतकऱ्यांना सदर सातबारा देणे बंद करण्यात आले, *मा.तहसीलदार साहेब यांना* निवेदन देण्यात आला.
अहेरी तालुक्यातील तुमिरकसा हे महसूल विभागाचा नोंदणी मध्ये कासमपल्ली मासहतच्या नावाने नोंद आहे त्यानुसार 2020-21 या वर्षापर्यंत तलाठी कार्यालय मेडपलीकडून तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना कासमपल्ली मासहत या नावाने शेतीचे हस्तलिखित सातबारा ही दिलेला आहे,
परंतु 2021 नंतर तुमिरकसा गावातील शेतकऱ्यांना महसूल विभाग व आंबेडकर तलाठी साजा कडून कासमपल्ली माहसहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आले, त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजना चा लाभ मिळत नाही
म्हणून मा, तहसीलदार साहेब आपण तलाठ्यांना कासमपल्ली मासहत या नावाने हस्तलिखित किंवा ऑनलाईन सातबारा देण्याचे निर्देश द्यावेत. जेणेकरून शासनातर्फे राबवण्यात येणारे विविध योजनांचा लाभ घेता येईल, अशी मागणी शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदनातून विनंती केली आहे.
त्यावेळी,पेसा अध्यक्ष श्री महारु तलांडी शा, व्य, समितीचे अध्यक्ष श्री बाबुराव तलांडी श्री लालु तलांडी श्री देसू तलांडी श्री नस्सा आत्राम श्री रमेश नरोटे श्री बिच्चु तलांडी श्री चरणदास नैताम श्री राजु गावडे श्री राकेश तलांडी देवाजी नरोटी श्री पुसू तलांडी श्री मंगरु आत्राम श्री सौरभ तलांडी इत्यादी गावातील शेतकरी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.