एकुण 65.60 किमी लांबीच्या रस्त्यांचे भूमिपूजन.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.10:- आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा 3 व केंद्र शासन सहाय्य मधील देवळी, वर्धा व कारंजा तालुक्यातील समावेश असलेल्या विविध कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथून आज आभासी पध्दतीने भूमीपुजन होणार आहे. या कामाचा वायगाव निपाणी येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अमर काळे, आमदारांसह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून नागरिकांनी सुध्दा भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत टप्पा 3 मधील दि.11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वर्धा जिल्हृयातील देवळी, वर्धा तालुक्यातील दहेगाव- वायगाव-कोसुर्ला-कात्री या राज्यमार्ग क्रमांक 322,267 च्या भाग देवळी ते कोसुर्ला 44.60 लांबी असलेल्या 356 कोटी 67 लक्ष रुपयाच्या रस्त्याची सुधारणा करणे, कारंजा तालुक्यातील मोर्शी-आष्टी, थार, पारडी राज्यमार्ग क्रमांक 292 च्या 21 किमी लांबी असलेल्या 158 कोटी 85 लक्ष रुपयाच्या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी भाग आष्टी ते नारा गोधनी या रस्त्याचे भूमीपूजन होणार आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अंभोरे यांनी कळविले आहे.