सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.9764268694
बल्लारपूर :_ दि :- 10/10/2024
बतुकम्मा उत्सव म्हणजे नवरात्री दरम्यान तेलगू भाषिकांचा देवीला समर्पित असलेला उत्सव. हा उत्सव गत 4 वर्षांपासून शहरात तेलगूवारी फाऊंडेशन तर्फे मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यावर्षीही शहरातील बालाजी वार्डातील बालाजी मंदिरासमोरील सुभाष लाॅन मध्ये बतुकम्मा उत्सव आयोजित करण्यात आला. यात मोठ्या संख्येने तेलगू भाषिक जनतेसोबत इतरही सर्व नागरिक सहभागी झाले. या उत्सवात विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट बतुकम्मा सजावटीचे 10 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नृत्य 7 पुरस्कार, 2 उत्साही नृत्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तेलगू ड्रेसिंग साठी मुली व महिला श्रेणी मध्ये 5-5 पुरस्कार, व सर्वांत पहिले आयोजन मंडपात आलेल्या पहिल्या 2 बतुकम्मांना फर्स्ट एंट्री व सेकंड एंट्री चा सम्मान मिळाला. या उत्सवात तेलगू स्त्रीयांसोबत छोट्या छोट्या मुलींनी देखील देवीच्या गाण्यांवर बतुकम्मा भोवती सांस्कृतिक नृत्य केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी तेलुगू वारी फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष शंकर महाकाली, सचिव प्रा. नागेश्वर गंडलेवार , कोषाध्यक्ष उमेश कोलावार यांच्या सह “TVF” च्या सर्व सदस्यांच्या प्रचंड मेहनतीने बतकम्मा उत्सवाची सांगता झाली.