पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा
अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे हे त्यांचे स्टाफसह वानवडी पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २१/०९/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना त्यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की गॅनम शाळे जवळ पुणे येथे एक परकिय नागरीक हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार आहे. मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक -२, कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता, महंम्मदवाडी रोड, गॅनम शाळे समोर वानवडी, पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी रोडवर परकिय नागरीक इसम नामे एरिक सिरील चेनेडु (Eric Cyril Chinedu) वय २४ वर्षे, रा. मोरया हाईटस, नाव्हले वस्ती, हांडेवाडी, हडपसर नायजेरीयन देशाचा नागरीक हा त्याचे ताब्यात किं.रु. ७,१९,०००/- रु किचा ऐवज त्यामध्ये ७,१४,०००/- रु किमतीचे ५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ ५,०००/- रु किमतीचा मोबाईल संच असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं.४०४/२०२२.एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी आरोपीकडील अंमली पदार्थ जप्त केला असून, दाखल गुन्हयाचा तपास एस.डी. नरके, पोलीस उप निरीक्षक, अं.प.वि.प. २. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक, एस.डी. नरके.. पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, शेळके, आझीम शेख, योगेश गांढरे, नितीन जगदाळे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.