मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे महापुरुषाचे प्रतिष्ठापणाला एका कार्यक्रमात जनतेला संबोधीत करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार म्हणाले की, माझे राजकारणाचे उगम छल्लेवाडा गावातूनच झालेला आहे, मी माझ्या शेवटच्या श्वासअसे पर्यंत मी छल्लेवाडा गावाला विसरणार नाही.
आणि दहा वर्ष्या आगोदर छल्लेवाडा हा गाव सोयी सुविधेपासून कोसोदूर होता. संपूर्ण छल्लेवाडा गाव चिखलाने माखलेला होता. मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो, तेव्हा पासून हळूहळू विकास कामांना गती आलेले आहे.आज संपूर्ण छल्लेवाडा गावात रस्ते, डांबरीकरणं, सिमेंट रस्ते नाले, लहान, मोट्या पुलिया आणि तसेच पिण्याची पाण्याची टाकी मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मंजूर करण्यात आले आहे, जवळजवळ त्या ठिकाणी 80%काम झालेला आहे.आणि समोरही करणार असे छल्लेवाडा गाववाशियांना कार्यक्रमात सांगण्यात आलेले आहे.आणि छल्लेवाडा गावातील पंचशील बौध्द समाजाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडावार तसेच भावी आमदार हणमंतु मडावी यांना श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आले आहे.या वेळी मंचावर उपस्थित अहेरी नागराअध्यक्षा रोजताई करपेत,माजी जिल्हा परिषद सदस्यां सुनिता कुसनाके, अहेरी माजी पंचायत समिती सभापती भास्कर भाऊ तलांडे, प्रशांत गोडसेलवार,सुरेखा आलाम,माजी जि. प. सदस्य अजय नैताम माजी उपसरपंच कार्तिक तोगाम, दिलीप मडावी, अज्जू पठाण, माजी सरपंच चंदू बेजलवार, उपसरपंच हरीश गावडे, सचिन ओलेटीवार, राजू दुर्गे, नरेंद्र गर्गम, स्वप्नील मडावी, रिंकू आत्राम, ग्रामपंचायत सदस्यां जयमाला गोलेटी, चिंटू आत्राम, जावेद भाऊ, प्रमोद गोडसेलवार, विनोद रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
तर पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर, उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, प्रभाकर जुमडे, प्रभाकर दुर्गे, गुलाब देवगडे, अनमोल बोरकर, सुनील जनगम, आदी उपासक, उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.