*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार*
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.9765268694
दि.17/10/2024 रोजी गुरूवार ला भेदोडा येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा भेडोडा व प्रज्ञा शील करुणा मंडळ
च्या संयुक्त विद्यमाने “वर्षावास धम्म प्रवचन मालिका” चा समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाची शुरुआत तथागत बुद्धांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प मालार्पण व धूप, दिप प्रज्वलित करून,सामुहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.त्यानंतर मान्यवराना पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी आयु.किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष ,केंद्रीय शिक्षक, आयु.नी.प्रगतीताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर,सुजाताताई नळे ,केंद्रीय शिक्षिका, या
प्रत्येक मार्गदर्शकांनी धम्माची गरज पटवून दिली. तसेंच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला जातो, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध शिबिराचे आयोजन करावे, विविध उपक्रमाचे नियोजन करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेचे काम प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावे अशी आव्हाने प्रत्येकाने मांडले.
यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आलेला भेदोडा राजुरा तालुका मध्ये वर्षावास धम्म प्रवचन मालिकेमध्ये धम्माच्या प्रचार व प्रसार करून उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल आयु.किशोर तेलतुंबडे केंद्रीय शिक्षक,के.एल गजभिये,प्रफुल भगत,आयु.नी.प्रगतीताई मेश्राम, आयु. धर्मुजी नगराळे अध्यक्ष ,संतोष कांबळे,सुजाताताई नळे भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन भा बौ म.ग्राम शाखा भेदोडा च्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे तसेच उत्कृष्ट संचालन आयु.किरण कुंभारे सर यांनी केले. या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातून आयु.प्रफुल भगत,के.एल.गजभिये, धर्मुजी नगराळे,संतोष कांबळे, वैभव नळे, आणि भेदोडा येतील बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती नंतर सरण्यत्र. घेवून कार्यक्रम समाप्त झाला.त्यानंतर भोजन दान झाले