इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल सीबीएससी च्या विद्यार्थिनिंची विभाग स्तरिय शालेय स्पर्धेकरिता निवड.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 20:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय सपेक टकरा स्पर्धेत इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा या काँन्व्हेंट च्या सीबीएससी विभागातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची विभागीय शालेय सेपक टकरा खेळाच्या स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.
१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघात संघ नायक दुर्वा बादल बेले, परी मंगेश लांडे, मनश्री राकेश गोनेलवार, श्रावणी सतीश बोबडे, स्मृती सतीश राजूरकर आदींचा समावेश होता. सर्व विजेत्यांचे आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षिरसागर यासह शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थीनी अभिनंदन केले आहे आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिडा शिक्षक हर्षल क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेऊन विविध प्रकारच्या शालेय क्रिडा स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थांचा सहभाग करवून घेतला. तसेच तालुका, जिल्हा, विभाग असा टप्पा गाठत राज्यस्तरीय करीता विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कार्य हर्षल सर करीत आहे. शालेय जीवनातच विद्यार्थिनी खेळात सहभाग घेऊन आपले क्रिडा कौशल्य दाखवले पाहिजेत. तसेच विध्यर्त्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांना सुद्धा अनन्य साधारण असे महत्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. इन्फंट शाळेने विविध खेळात आपल्या विद्यार्थ्यांना संधी देऊन यश संपादन केले आहे.