युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- विधानसभा निवडणुक जाहीर होऊन आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना विदर्भातील अनेक जागांवरूनच महाविकास आघाडीत खटके उडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सध्या पुढे सरकताना दिसत नाही. काही जागांवर ही चर्चा अडली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट विदर्भातील काही जागांवर अडून बसले आहेत. तर काही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटालाही हव्या आहेत. त्यामुळे जागा वाटपात तिढा निर्माण झाला आहे. त्या जागा कोणत्या आणि त्या जागांसाठी रस्सीखेच का सुरू आहे याची कारणे आता समोर आली आहेत.
विदर्भातल्या या जागावर वाद? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आणि शिवसेना उबाठा मिळून निर्माण झालेली महाविकास आघाडीत जागा वाटपात कळीचा मुद्दा ठरतोय तो विदर्भातल्या जागांचा. विदर्भातल्या काही जागांवर काँग्रेस बरोबर शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यात नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. हा मतदार संघ काँग्रेसच्या गिरीश पांडव यांच्यासाठी हवा आहे. मात्र हा मतदार संघ सोडण्यास शिवसेना ठाकरे गट तयार नाही. दोन्ही पक्षा या जागेवर अडल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्यात प्रमाणे यवतमाळ विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा आहे. मात्र त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. अकोला पश्चिम मतदार संघावरही शिवसेनेनं दावा केला आहे. मात्र काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेच्या राजेश मिश्रा यांना इथून निवडणूक लढायची आहे. कारंजा विधानसभा मतदार संघ ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. इथून प्रणित मोरे पाटील हे मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. या शिवाय दिग्रसचाही वाद सुटलेला नाही. ही जागा काँग्रेसला हवी आहे. काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला हा मतदार संघ हवा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने पवन जैस्वाल यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे.
वर्धा जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार संघात ही वाद आहेच. या मतदार संघातून काँग्रेसचे अमर काळे निवडणूक लढत होते. मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शिवाय त्यांना लोकसभेची निवडणूक लढत विजय ही मिळवला आहे. आता काँग्रेसचा या जागेवरली दावा कायम आहे. तर राष्ट्रवादीने ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरला आहे. खासदार अमर काळे यांना ही जागा त्याच्या पत्नीसाठी मागत आहे. पण काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. अमर काळे यांच्या पत्नीला उमेदवारी देवू असे काँग्रेसने सांगितले आहे. अजूनही काही जागा आहे ज्यात हा वाद सुरू आहे.
यासर्व जागांवरूनच महाविकास आघाडीत खटके उडत आहेत. तुटे पर्यंच ताणू नका असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तर काँग्रेसच्या हायकमांडनेही सबुरीने घ्या असा सल्ला दिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.