पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या स्वंयकेंद्रित व स्वार्थी भुमिकांमुळे सर्वत्र विचाारधारा आधारीत राजकिय पक्षांचे अस्तित्व संपूष्टात येण्यास धोका निर्माण झाल्यामुळेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने राज्यात भारतीय ट्राईबल पार्टी, रिपब्लिकन सेना, संयुक्त रिपब्लिकन आघाडी-विदर्भ, ओबीसी मोर्चा, इंडियन नॅशनल लिग व इतर समविचारी पक्षांबरोबर युती-आघाडी निर्माण करून राज्यात जवळपास 150-200 उमेदवार विधानसभा निवडणूकीत उभे करून पुरोगामी महाराष्ट्रात स्वतंत्र बाण्याचे फुले- शाहू- आंबेडकरी बहुजन- रिपब्लिकनवादी राजकारणाला बळकटी देण्याची भुमिका घेत राज्यात महायुती व महाविकास आघाडी हे दोन्हीही महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतलेली आहे.
कालपर्यंत भाजप महायुती सोबत असणारे निवडणूक तिकीटे न मिळाल्यामुळे काँग्रेस आघाडीत सामील झाले आहेत, तर काँग्रेस आघाडीतील त्याच कारणास्तव भाजप-महायुतीत सामिल झाल्यामुळे भाजप महायुतिचा कोण व काँग्रेस महाविकास आघाडीचा कोण हा गोंधळ आघाडी व महायुतीच्या राजकारणाने निर्माण केलेला असून दोघेही आपआपली घराणेशाहीची जपणूक करण्याचा सचोटीने प्रयत्न करीत असून त्यांना राज्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची काहीही घेणे नाही. संविधान, लोकशाही बचाव ही नाममात्र जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे.
राज्यात भाजपाप्रणित महायुती सरकारने विजयाची खात्री नसल्यामुळेच योजनांची खैरात करीत राज्याच्या आर्थिक नियोजणाची विल्हेवाट लावीत हजारोंच्या संख्येने अवाजवी शासननिर्णय घेऊन राज्यातील शासन यंत्रनेचा दुरूपयोग केला असून राज्यात कायदा- सुव्यवस्था या सारख्या महत्वपूर्ण प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष आहे, तर विकासाच्या नावाखाली शेतकरी- शेतजमिनी उध्वस्त होत असून, आरक्षणाच्या राजकारणापोटी महायुती व महाआघाडी या दोन्हीनी महाराष्ट्राला जातीय संघर्षात ढकलण्याचे पाप केलेले आहे.
महाराष्ट्रात नवीन धोरणांचे राजकारण व सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय छत्रपती शिवराय, फुले शाहू, डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्राला विकासाच्या नवीन वाटा सापडणार नाहीत. म्हणून प्रस्थापितांचे घराणेशाही जातीयवादी, बहुजन समाज विरोधी राजकारण मोडून काढण्यासाठी राज्यातील मतदारांनी, भूमिहिंनाना जमीनवाटप, प्रत्येक कुटूंबात ऐपतीप्रमाणे एक सरकारी नोकरी, शेतकऱ्याना मोफत विज व वय वर्षे ६५ नंतर पेन्शन योजना, अनुसूचित जाती- जमातींच्या वर्गीकरणास व आदिवासींच्या हिंदूत्वीकरणास तसेच डिलिस्टींगला विरोध, विस्थापितांचे संपूर्ण पुर्नवसन, पदोन्नती आरक्षण, ओबीसी जनगणना, मुस्लीमांना आरक्षण, भटके-विमुक्ताना अत्याचार प्रतिबंधक कायदयाचे संरक्षण व क्रेमिलियर मर्यादा हटविने, राज्याचा समतोल विकास, विदर्भ राज्य निर्मिती अशा अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ही निवडणूक लढवित असून पर्यायी जनता भिमूख धोरणे व राजकारण या गरजेपोटी, बदल अपेक्षित असणारे मतदार जातियवादी -घराणेशाहीच्या पक्षांचे व भ्रष्ट नेत्यांचे, सत्तापिपासू राजकारणाचा नायनाट करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. असे मत अँड.डॉ.सुरेश माने यांनी व्यक्त केले.
या निवडणूकीत संविधान बचाव-लोकतंत्र बचाव हे राजकारण महाविकास आघाडीच्या कामी येणार नाही कारण त्यांनीसुध्दा स्वताची, जातीय, कौटूंबिक दुकानदारी चालवून राज्यघटनेच्या नावाखाली जात-कुटूंबाचे राजकारण केलेले आहे. संविधान सरक्षणासाठी काँग्रेस, भाजपा संस्कृतीचे प्रतिनिधी संविधान रक्षण करू शकत नाहीत कारण हेच संविधानाचे विरोध आहेत त्यामुळे संविधानवादी प्रतिनिधी निवडण्यासाठीच मतदारांनी मतदान करावे असे बीआरएसपी च्या नेत्यांनी आव्हान केले आहे.
बीआरएसपी 2015 मध्ये स्थापन झाल्यानंतर राज्यात प्रथमच स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवित असून गेल्या 8 वर्षातिल पक्षाच्या ध्येयधोरणाच्या, लोकसंघर्षाच्या आधारावर पक्षांच्या उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल असा पक्षाला विश्वास आहे.

