अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माजी विधान परिषद सदस्य डाॅ. रामदास आंबटकर यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वर्धा नदीवरील आजनसरा बँरेज या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता आणि निविदा काढण्यात आली असून यामुळे तालुक्यातील वडनेर परिसरातील अनेक शेत जमिनी हिरव्यागार होणारा असुन शेतकऱ्यांच्या शेतीपिकां करिता हा प्रकल्प जीवनदायी ठरणार आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाकडून 156.53 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या प्रकल्पाचे कामाला सुरुवात होणार आहे.
आजनसरा बॅरेज प्रकल्प हा हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात माजी विधान परिषद सदस्य डाँ. रामदास आंबेडकर यांचे मोठे योगदान लाभले आहे. हा प्रकल्प अनेक दशकापासून मंजूर झाल्यानंतर अनेक कारणांमुळे रखडला होता. याकरीता माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांनी विधानपरिषद सदनामध्ये मुद्दा उचलून प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेऊन या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यतेसह निविदा सुद्धा काढण्यात आली आहे. लवकरच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असून यामुळे वडनेर परिसरात अनेक दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदी झाला असून परीसरातील शेतकऱ्यांनी माजी आमदार डॉ. आबंटकर यांचे अभिनंदन केले आहे.

