रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सर्व समजाला घेऊन मोट बांधून या विधानसभा निवडणुकीत दाखल झाले आहे.
परतूर मंठा नेर सेवली 99 विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार रामप्रसाद थोरात यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दि. 24 ऑक्टोंबर गुरुवार रोजी सकाळी 10:00 वाजता संविधान चौक परतुर रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालय परतुर अशा मार्गाने पदयात्रा काढुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे तरी परतुर मंठा नेर सेवली विधानसभेतील सर्व आंबेडकरवादी, संविधानवादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी भारिप चे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा चे सर्व पदाधिकारी समता सैनिक दल सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी व मतदार या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे, जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, शहर अध्यक्ष राहुल नाटकर महासचिव सचिन सोनपसारे आशोक ठोके मनोज वंजारे, मिलिंद गायकवाड, बाळु झोटिंग, प्रदीप साळवे, प्रशांत वाकळे, स्वप्नील पहाडे, राहुल पहाडे, आनंद गरड, आकाश भदर्गे, अझर पटेल, लखन केवट, सुनील भदर्गे समाधान भदर्गे समाधान सिरसाठ यांनी केले आहे