अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नांची प्रतिपूर्ती करण्याच्या उद्देशांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन १३/१०/२०२४ व २०/१०/२०२४ ला विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर येथे करण्यात आले. विविध १८० शाळेच्या तब्बल ३६०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेमध्ये ज्युनिअर सायंटिस्ट ओलंपियाड, कॅटापुल्टीकॉन, मॅथ-अ-मेज, एक्स्विसिट, मॉडेल-ओ-थॉन, मॉडेल युनायटेड नेशन अशा तब्बल सहा विविध स्फूर्तिदायक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील भारतीय विद्या भवन्स गिरधरदास मोहता विद्या मंदिर येथील नववीचा विद्यार्थी यथार्थ कौस्तुभ जनईकर यांनी मॅथ-अ-मेज व ज्युनिअर सायंटिस्ट ओलंपियाड मध्ये प्रथम व मॉडेल-ओ-थाॅन मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये सुप्रसिद्ध गणित शिक्षक श्री हर्ष प्रियम सर व लोक प्रसिद्ध श्रेयस विजयवारिया प्रमुख पाहुणे होते. या श्रेयाचे यश यथार्थने सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका धरती देशमुख, डायरेक्टर आशिष कुमार सरकार, आई डाॅ. नमिता जनईकर, आजी श्रीमती लतिका बेलेकर, काका डॉ. भूमेंद्र भोंगाडे व मावशी डॉ. चेतना भोंगाडे यांना दिले.