प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.23:- विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हा कारागृहास भेट देऊन कारागृहातील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली. यावेळी भेटी दरम्यान कारागृह अधीक्षक नितीन क्षिरसागर, तुंरुगाधिकारी श्रेणी 2 जितेंद्र भावसार, सुहास नागमोते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मतिन नलगिरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कारागृहातील बदयांना देण्यात येणा-या सोई सुविधा याबाबत पाहणी केली. निवडणूकीच्या अनुषंगाने कारागृहात आभासी बैठक घेऊ नये, कारागृहात कोणतीही हालचाल होणार नाही याबाबत कारागृहातील अधिका-यांना त्यांनी सुचना दिल्यात. यावेळी कारागृहातील शिपाई अमित कोठारकर, अतुल जाधव, कर्मचारी व कारागृहातील बंदी उपस्थित होते.