पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- फुले शाहू आंबेडकर आणि शिवराय यांच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी आपले जीवन वेचणारे सुप्रसिद्ध प्रबोधनकार कविवर्य युवराज हिरामण भांगे यांचे निधन झाल्याने एका प्रबोधनात्मक चळवळीचा अंत झाला आहे.
बहुजन समाजाचे असलेले कविवर्य युवराज हिरामण भांगे त्यांचे निधन आज दिनांक 23 ऑक्टंबर रोजी वयाच्या 64 व्या रोजी अल्पशा आजारामुळे झाले. युवराज भांगे हे बहुजन समाजाचे अत्यंत महत्त्वाचे आणि जनसामान्याच्या हिताचे काम करीत असून त्यांनी यामध्ये प्रसिद्धी कमवली त्यांच्या अत्यंत विधीला सांसद श्याम कुमार बर्वे राजेंद्र मुळक सह फुले शाहू आंबेडकर चळवळीतील शेकडो कार्यकर्ते नागरिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यासोबत आंबेडकर चळवळीचे प्रमोद खोब्रागडे धर्मेश पाटील आणि इतर बीएसपी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार श्याम कुमार बर्वे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले की, युवराज भांगे यांनी काँग्रेसला प्रचंड बहुमत देण्याची चर्चा त्यांनी केलेली आहे. त्यांनी सर्व जन माणसाचे प्रश्न प्रबोधनातून मांडले आहे.
यावेळी बुहुजन समाज पार्टीच्या वरिष्ठ कार्यकर्ते आणि नेत्यांनी यामध्ये आक्रोश दाखविला आहे. कारण युवराज भांगे हे बहुजनाचे प्रबोधनकार असून हे बहुजनाच्या हितासाठी तत्पर आणि कट्टर होते त्यामुळे श्याम कुमार बर्वेचे वक्तव्य मुळे बहुजन समाज आक्रोशीत असल्याची दिसून येत आहे.