मानवेल शेळके, अहमदनगर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यानं शिवसेना उबाठा चे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे दोन्ही पक्षात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे तिकीट अनुराधा नागवडे यांना विकले आहे, असा थेट आरोप श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार राहुल जगताप यांनी केला आहे.
राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी त्यांना मुंबईत उद्धवसेनेत प्रवेश केला. उद्धव शिवसेने कडून श्रीगोंदा Sreegonda मतदारसंघासाठी एबी विधानसभा फॉर्मही नागवडे यांना देण्यात आला. याबाबत राहुल जगताप Rahul Jagtap यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, नागवडेंचा सेनेत प्रवेश होण्यापूर्वी त्यांचा एबी फॉर्म तयार केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही सामान्य कार्यकत्यांना न्याय देणारी होती. मात्र, संजय राऊत यांनी ‘द्या खोके आणि उमेदवारी एकदम ओके’ असे सूत्र राबविले आहे. हे लोकशाहीला घातक आहे.
राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar हे माझे राजकारणातील श्वास आहेत. अनेक अडचणी आल्या, पण त्यांची साथ सोडली नाही. शरद पवार याची श्रीगोंद्याच्या जागेबाबत काय अडचण होती मला माहीत नाही. माझा त्यांच्यावर कोणताही रोष नाही, असे जगताप यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत काय करायचे यावर कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.