बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बुलढाणा:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या उच्चशिक्षित तरुणीला वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाहाला मुलाच्या कुटुंबियांचा विरोध होता. आता सुनेला वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळाल्यानंतर सासू आणि दिराने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ओबीसी समाजाचे वृशांक चव्हाण यांनी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन मागासवर्गीय असलेल्या उच्चशिक्षित डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्याशी आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. चव्हाण कुटुंबात या विवाहाला आधीपासूनच जोरदार विरोध होता. त्यात आता विधानसभा निवडणुकीत सुनेला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर कुटुंबात आगपातळ झाली असून त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे.
मेहकर विधानसभा मतदार संघ हा अनुसुचित जाती (SC) साठी राखीव मतदार संघात वंचित बहुजन आघाची तर्फे डॉ. ऋतुजा चव्हाण यांना प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र डॉ. ऋतुजा चव्हाण आणि वृशांक चव्हाण यांच्या आंतरजातीय विवाहाला ऋतुजा यांच्या सासू आणि दिराचा विरोध होताच, आता तो विरोध उघड झाला असून चक्क आपल्या सुनेच्या विरोधात त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
ऋतुजा यांना सासू आणि दिराने विरोध केला असला तरी पती वृशांक खंबीर साथ दिली आहे. पती वृशांक यांनी म्हटलं की, मी पत्नीसोबत आहे. मी आंतरजातीय विवाह करून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेतली असल्याचा राग आई भावाला आहे. माझ्या आई भावांना मागासवर्गीयांचा तिरस्कार असल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचं पतीने म्हटलं. सरकार जरी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत असलं तरी माझ्या घरांच्याचा त्याला कठोर विरोध होता असही वृशांकने सांगितलं.