हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली. येथे एक महिला आपल्या स्वतःच्या घरी महिला आणि मुलीकडून वेश्या व्यवसाय चालवत होती. यांची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. सदर महिलेच्या घरून चार पिडीत मुलीची सुटका केली. या सर्व मुलींना स्वाधारगृहात पाठविण्यात आले आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक पार पाडत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू आहे आहे. पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करण्याकरीता पोलीस स्टेशन रामनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शनिवारी (दि. 26) गस्त सुरू असताना शहरात एक महिला वेश्याव्यवसाय चालवित असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांनी खानापुरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या घरी छापा टाकला आणि या देहव्यवसायचा पर्दाफाश केला. स्त्रीया व मूली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि संतोष निभोरकर, महिला व पुरुष अंमलदार, समाजसेविका श्रीमती सरिता राजेद्र मालु, यांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. आरोपी तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख, रा.जुनोना चौक, चंद्रपूर या दलाल महिलेवर कारवाई करण्यात आली. तसेच 4 पिडीत महिलाची सुटका करून त्यांना स्स्वाधारगृहात दाखल करण्यात आले. रामनगर पोलीस स्टेशन मध्ये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.