*डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे विविध गावात कॉर्नर सभा*
*ढोल ताशे व आदिवासी संस्कृती परंपरेनुसार गावकऱ्यांनी स्वागत केले*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
*अहेरी*:- लोकांचे कल्याण व्हावे आणि सर्वांगीण विकास व्हावे यासाठी राज्यातील महायुती सरकार अनेक ऐतिहासिक व क्रांतिकाक निर्णय घेतले असून होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत खंभिर व भक्कमपणे पाठीशी राहून साथ द्या असे विचार महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) अधिकृत उमेदवार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.
ते अहेरी तालुक्यातील इतलचेरू, तानबोडी, किष्टापूर (वेल), बोटलाचेरू, वेलगुर, वेलगुर टोला, रामय्यापेठा, मोद्दुमाडगु, मद्दीगुडम आदी ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन आपले ठाम मत मांडले.
कॉर्नर सभेत डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी पुढे, अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी दीड हजार रुपये प्राप्त होत असून महिला स्वावलंबन, सक्षम व स्वाभिमानी जगावे व बनावे यासाठी महायुती शासनाचा स्तुत्यप्रिय व अभिनव योजना असून यंदाच्या निवडणुकीत मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास अजून शासनाचे विविध योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे आणि या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले.
आणि ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ आहे त्यामुळे मागील तब्बल पन्नास वर्षापासून जनसेवा अविरत, अविश्रांत व सातत्याने करीत असून होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मला निश्चितच विजयी करणार असा ठामविश्वास व्यक्त करून विक्रमी फरकाने निवडून देण्याचे विनवणी व आवाहन करीत आजतागायत अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात केलेल्या विकासात्मक कामाचा उल्लेख केले.
विशेष व उल्लेखनीय म्हणजे कॉर्नर सभेदरम्यान विविध गावातील गावकऱ्यांनी आदिवासी संस्कृती, परंपरेनुसार ढोल, ताशे, वाजंत्री आणि फुलांचे वर्षाव करून व धर्मराव बाबा आगे बडो जयघोषणी परिसरातील वातावरण घडीमय केल्याचे प्रकर्षाने जाणवले.