प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- 22 ऑक्टोंबर 2024 रोजी हिंगणघाट शहराच्या मध्यभागी असलेल्या आणि पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर असलेल्या डॉ. रूबा चौक येथे लाहोटी ब्रदर्स यांच्या मोबाईलच्या दुकानात चोरी करण्याचा आल्याचा घटनेने खळबळ माजली होती. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार करून तपास केला होता. अखेर या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
सदर गुन्ह्यांची हकिकत याप्रमाणे आहे की मनीष लाहोटी यांचे रूबा चौक हिंगणघाट येथील लाहोटी ब्रदर्स या मोबाईल दुकानात 22 ऑक्टोंबरला मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे दुकानाचे शटर्सचे लॉक तोडुन आतमध्ये प्रवेश करून, विवो कंपनीचे एकुण 30 मोबाईल किंमत 5,00,000 रूपये अशा माल चोरून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे दाखल केला होता.
चोरीची तक्रार दाखल करून हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अप. क्र 1400/2024 कलम 351 (4), 305 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथक करीत होते. तपास दरम्यान सदर गुन्ह्यात कार क्र. UP-80 -GS- 5079 चा वापर झाल्याचे तांत्रिक माहिती वरून निष्पन्न झाल्याने, सदर कार मालकाच्या शोध घेणेकरीता पथक उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे जावुन त्याचा शोध घेतला असता 2 आरोपी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर आरोपी साथीदारांसोबत संगणमताने केल्याचे कबुल केले असुन, सदर गुन्ह्यात त्याचे मालकिची एक वॅगनआर व्हीएक्सआय कार क्र. UP – 80 GS – 5079 चा वापर केल्याचे व चोरुन नेलेले सर्व मोबाईल त्याचे साथीदारांकडे असल्याचे सांगितले.
त्यावरून आरोपी/ कार मालक नामे यशपालसिंग शितलप्रसाद सिंग वय 43 वर्ष, रा. मेहरमपुर तह. फतेहाबाद जि. आग्रा यास ताब्यात घेऊन व गुन्ह्यात वापरलेली एक वॅगनआर व्हीएक्सआय कार क्र. UP-80 GS – 5079 किंमत 6,00,000 रूपये माल जप्त करून वर्धा येथे परत आले असून, आरोपीचे इतर साथीदार 1) ईरफान बालु हामी खान 2) जाहिद उर्फ ग्यानी जुहुर खान 3) जमशेद आस मोहम्मद सर्व रा. सालाहेकी, पो.स्टे. सदर तह. जि. जुह- हरियाणा यांच्या शोध घेणे सुरू आहे. 01 आरोपी व कार हिंगणघाट पोलीस स्टेशन यांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशा प्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते, पो. अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, आशिष महेशगौरी, रवि पुरोहित, विनोद कापसे, अभिषेक नाईक, शुभम राऊत, मुकेश ढोके सायबर सेल चे दिनेश बोथकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.